पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशेच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 294 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 347 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 86 हजार 365 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 75 हजार 128 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 09 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8749 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात 2488 अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 2488 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 224 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7930 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
Web Title : Pune Corona | 294 new patients of Corona in the last 24 hours in Pune city, know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
IMD Alert | पुढील काही तासात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’