पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Corona | पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या अडीचशेच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या अडीच हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 229 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 278 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 96 हजार 772 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 85 हजार 565 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 04 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8949 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात 2258 अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 2258 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 208 रुग्ण गंभीर आहेत. तर 290 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7987 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 31 लाख 80 हजार 043 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation).
Web Title : Pune Corona | 278 corona patients discharged in Pune city in last 24 hours find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune News | ‘विचलीत न होता काँग्रेस कार्यकर्ते नेटाने लढतील’ – माजी आमदार मोहन जोशी