पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या (Pune Corona) संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांच्या तुलने बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या अधिक असून आज अडीचशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 258 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 249 रुग्णांना डिस्चार्ज (Pune Corona) देण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 90 हजार 228 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 79 हजार 257 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 08 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8843 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात 2128 अॅक्टिव्ह रुग्ण
आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 9371 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 29 लाख 95 हजार 863 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 2128 रुग्ण अॅक्टिव्ह (active patient) आहेत.
त्यापैकी 201 रुग्ण गंभीर आहेत. तर 249 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Web Title : Pune Corona | 258 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update