पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ पहायला मिळत आहे. मध्यंतरी रुग्ण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) वाढले होते. परंतु मागील काही दिवसांपासून शहरामध्ये दैनंदिन बरे होणाऱ्या रुग्णापेक्षा नवीन रुग्णांची संख्या (Pune Corona) अधिक अढळून येत आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या वाढत आहे. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 250 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 222 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 85 हजार 285 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 73 हजार 535 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8720 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात 3030 अॅक्टिव्ह रुग्ण
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 8403 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 28 लाख 25 हजार 078 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 3030 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 224 रुग्ण गंभीर आहेत. तर 361 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Web Title :- Pune Corona 250 new corona patients in Pune city in last 24 hours
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Shrawan 2021 | भगवान शंकराच्या पूजेत कधीही करू नका ‘या’ 5 गोष्टींचा वापर, जाणून घ्या
Pune Rains | पुण्यातील पुराचा धोका टळला ! मुठा नदीतील विसर्ग 18 हजाराहून 4 हजारावर आला