पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Corona in Pune city) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेवर आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या अडीच हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 220 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 304 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 88 हजार 902 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 77 हजार 883 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8813 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात 2206अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 2206 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 202 रुग्ण गंभीर आहेत. तर 354 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7640 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 29 लाख 43 हजार 963 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
Web Title :- Pune Corona | 220 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Unlock | पुण्यातील निर्बंध शिथील? उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना Live Video