पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये शनिवारी (दि.7) 204 कोरोनाबाधित (Pune Corona) आढळून आले आहेत. तर 294 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. आज विविध तपासणी केंद्रावर 9 हजार 217 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, यामध्ये 294 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (positive Report) आला आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची (Pune Corona) संख्या कमी झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरातील (Pune City) सक्रिय रुग्णांची संख्या ही 2 हजार 295 इतकी झाली आहे. आज दिवसभरात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. तर 6 रुग्ण शहरातील आहेत. आजपर्यंत शहरामध्ये 8 हजार 808 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्ण संख्या ही 203 इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 358 इतकी आहे.
शहरात आत्तापर्यंत 29 लाख 36 हजार 323 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
यापैकी 4 लाख 88 हजार 682 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
तर यापैकी 4 लाख 77 हजार 579 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Web Title :- Pune Corona | 204 new corona patients in Pune city in last 24 hours find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update