पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 181 नवीन रुग्णांची (Pune Corona) नोंद झाली आहे. तर 331 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 85 हजार 466 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 73 हजार 866 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 08 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8725 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुण्यात 2875 अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 2875 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 226 रुग्ण गंभीर आहेत. तर 355 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7620 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
Web Title :- Pune Corona | 181 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update