पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Corona | पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दीड हजाराच्या जवळपास आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 162 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 167 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 1 हजार 790 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 91 हजार 233 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 04 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 02 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 02 रुग्णांचा (Pune Corona) समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9040 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
पुण्यात 1517 अॅक्टिव्ह रुग्ण
पुणे शहरामध्ये सध्या 1517 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 191 रुग्ण गंभीर आहेत. तर 223 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6159 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 34 लाख 02 हजार 014 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)
Web Title : Pune Corona | 162 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics
Pune News | निळूभाऊ फुले, शंकरराव खरात यांच्या नावाने पुरस्कार सुरू करा
CM Uddhav Thackeray | राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार का? CM उद्धव ठाकरे म्हणाले…
Akhil Bhartiya Maratha Mahasangh | ‘या’ आरोपानंतर अखिल भारतीय मराठा महासंघात मोठा पेच, महासंघात फूट?