Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 122 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | 122 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics
पुणे : ऑनलाइन – पुणे शहरात कोरोना रुग्णांची (Pune Corona) संख्या नियंत्रणात आली असताना मागील दोन दिवसांपासून शहरात शंभरच्या वर रुग्ण आढळून येत आहे. बुधवारी शहरात 120 नवीन रुग्ण (Pune Corona) आढळून आले होते. तर आज (गुरुवार) यामध्ये वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना बरे (Recover) होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या वाढली आहे. दरम्यान, दोन दिवसांत शहरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची (death) नोंद झाली नसल्याने काहींसा दिलासा मिळाला आहे. आज दुपारी चार वाजेपर्यंत शहरात 122 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 6 हजार 027 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 122 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह (Report positive) आला आहे. याच दरम्यान 38 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 37 लाख 74 हजार 327 प्रयोगशाळा तपासणीत 5 लाख 8 हजार 041 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 लाख 98 हजार 069 जणांनी कोरोनावर मात केली आहे. (Pune Corona)

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या शहरामध्ये 863 सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये 85 रुग्ण गंभीर आहेत. तर 60 रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. शहरात आजपर्यंत 9 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Web Title :- Pune Corona | 122 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

 

Anti Corruption Bureau Thane | 50 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी ‘उत्पादन शुल्क’मधील अधिकाऱ्यासह दोघे अँटी करप्शनच्या जाळ्यात

 

Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 877 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

SBI Rates Hike | स्टेट बँकेने वाढवला व्याजदर! आता महाग झाले कर्ज, द्यावा लागेल जास्त EMI

 

Maharashtra Board Exam | राज्यात 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांच्या तारखा जाहीर

 

SCSS | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुमच्यासाठी ठरू शकता लाभदायक ! केवळ पाच वर्षाच्या मॅच्युरिटीवर देईल 14 लाख रुपये; जाणून घ्या