पुणे : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीमध्ये पुणे शहरातून (Pune Congress) नियुक्त केलेल्या पदाधिकार्यांच्या निवडीवरून धुसफूस सुरू झाली आहे. जनतेशी कुठल्याही प्रकारचा संबध नसलेल्यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान दिल्याने सर्वसामान्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये (Pune Congress) नाराजीनाट्य सुरू झाले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्याच्या कॉंग्रेस प्रदेशअध्यक्षपदी नाना पटोले (maharashtra congress president nana patole) यांची निवड झाल्यानंतर राज्य कार्यकारिणीची निवड बराचकाळ प्रलंबित होती. अखेर काल उशिरा अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने उपाध्यक्ष, खजिनदार, सरचिटणीस, चीटणीस, कार्यकारी समिती, अनुपालन समिती सदस्यांची जंबो कार्यकारिणी घोषित केली. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या (Pune Corporation Election) पार्श्वभूमीवर विद्यमान शहर अध्यक्ष रमेश बागवे (city congress president ramesh bagwe) यांचीच फेरनियुक्ती केली आहे.
सरचिटणीस पदी अभय छाजेड (Abhay Chhajed) आणि अजित आपटे (Ajit Apte), रोहीत टिळक (Rohit Tilak), विरेंद्र किराड (Virendra Kirad) यांची चिटणीसपदी माजी आमदार दिप्ती चवधरी (Former MLAs Dipti Chavdhari), डॉ. हाजी जाकीर शेख (Dr. Haji Zakir Sheikh) , प्रवक्तेपदी अनंत गाडगीळ (Anant Gadgil as Spokesperson), कार्यकारी समिती तसेच अनुपालन समितीमध्ये उल्हास पवार (Ulhas Pawar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, मागील कार्यकारिणीच्या तुलनेत अनेकांना डच्चू देण्यात आला आहे.
मात्र, रमेश बागवे यांची नियुक्ती झाल्यानंतर शहर अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावलेल्या काही मंडळींचा बागवे यांचीच फेरनिवड झाल्याने हिरमोड झाला आहे.
यासोबतच पुण्यातून जेमतेम निवड झालेल्यांमध्ये जनतेशी काही संबध नसलेल्यांचा तसेच पक्षाच्या
कार्यक्रमांमध्ये अथवा आंदोलनांमध्ये कधीही सहभागी न झालेल्या मंडळींचा समावेश करण्यात आल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
कोरोना असो अथवा पूर परिस्थितीमध्येही पक्षाच्या झेंड्याखाली काम करणारे,
पक्षाच्या माध्यमातून विविध आंदोलनात अग्रभागी असलेल्या अनेक बिनीच्या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना
डावलण्यात आल्याने शहर कॉंग्रेसमध्ये मोठ्याप्रमाणावर नाराजी असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.
Web Title : Pune Congress | The office bearers became invisible to the people and the party movement! Dissatisfaction with the election in the city congress
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
SBI Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती