मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (BJP MLA Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. भाजपने हि जागा बिनविरोध करण्याची मागणी केली होती. मात्र महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) भाजपची मागणी धुडकावून लावत निवडणूक (Chinchwad by-Election) लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करुन राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांच्या नावाची घोषणा केली आहे. (Pune Chinchwad Bypoll Election)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
चिंचवड आणि कसबा पेठ (Kasba Bypoll) विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक आयोगाने (Election Commission) पोटनिवडणूक (Pune Chinchwad Bypoll Election) जाहीर केली आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादीने नाना काटे (Nana Kate) यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत दिसणार आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.@OfficeofUT @NANA_PATOLE
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 7, 2023
चिंचवड आणि कसबा पेठ निवडणूकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केली होती. मात्र महाविकास आघाडीकडून बराच काळ सस्पेन्स ठेवण्यात आला होता. महाविकास आघाडीकडून कसब्याची जगा काँग्रेसला आणि चिंचवडची जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. काँगेसनं (Congress) कसब्यातून बाळासाहेब दाभेकर (Balasaheb Dabhekar) यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र चिंचवडमधून राष्ट्रवादीने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली.
सोमवारी अजित पवारांनी पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची पिंपरी चिंचवडमध्ये येऊन बैठक घेतली.
त्यानंतर रात्री उशिरा शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे (Rahul Kalate) हे अजित पवारांना (Ajit Pawar)
त्यांच्या घरी जाऊन भेटले. त्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करतील आणि
अजित पवार या उमेदवाराचा अर्ज दाखल करण्यासाठी पोहचतील असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं होत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Chinchwad Bypoll Election | Announcement of candidate from NCP for Chinchwad by-election, Jayant Patal tweeted the information
हे देखील वाचा :
Pune News | महाराष्ट्र राज्य कारागृह अधिकारी व कर्मचारी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
Shraddha Kapoor | पिंक शॉर्ट ड्रेस मध्ये हटके दिसते श्रद्धा कपूर; क्लासी लूकने वेधले सर्वांचे लक्ष
Jitendra Awhad | छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम; म्हणाले…