Pune Cheating Fraud Case | पुणे : बँकेतून पसरस्पर पैसे काढून ज्येष्ठ दाम्पत्याची सव्वा कोटीची फसवणूक
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Cheating Fraud Case | जॉईंट डिमॅट अकाऊंट मधून वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स तसेच ट्रेडिंगमधून झालेला नफा व शेअर्सची रक्कम बँकेतून परस्पर काढून घेत एका ज्येष्ठ दाम्पत्याची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2021 ते आजपर्यंत घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) तिघांवर एमपीआयडी अॅक्ट (MPID Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Cheating Fraud Case)
याबाबत शारलेट रफेल शिरसाठ (वय-76 रा. कारलाईल कोर्ट, वानवडी) यांनी सोमवारी (दि.19) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रफुल्ल दयानंद वाघमारे, अंजली प्रफुल्ल वाघमारे, सॅम्युअल वाघमारे (सर्व रा. कात्रज) यांच्यावर आयपीसी 406, 420, 468, 471, 120(ब), 34 सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID Act) कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांचे पती वयस्कर असल्याचे व एकटे असल्याचा गैरफायदा घेतला. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या पतीचे बँकेत असलेल्या जॉईंट डिमॅट अकाउंट मधून वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स तसेच ट्रेडिंगमधून झालेला नफा, शेअर्सची एकूण रक्कम फिर्यादी यांच्याकडून घेतलेल्या चेकचा वापर करुन परस्पर काढून घेतले. आरोपींनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी व पतिच्या बँक खात्यातून 1 कोटी 23 लाख 46 हजार 987 रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
आरोपींनी फिर्यादी यांच्या बँक खात्यातून काढून घेतलेले पैसे परत करण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र दिले. मात्र, तरी देखील आरोपींनी फिर्यादी यांचे पैसे परत दिले नाहीत. याबाबत फिर्यादी यांनी परिमंडळ -5 चे पोलीस उपायुक्तांकडे तक्रार अर्ज केला होता. पोलीस उपायुक्तांनी आरोपींवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश
दिल्यानंतर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे करीत आहेत.
- Pune Shivaji Nagar Police | जबरी चोरी करुन कोयते बाळगणारी टोळी शिवाजीनगर पोलिसांकडून गजाआड (Video)
- Pune Police Crime Branch | पुणे: गुन्हे शाखेकडून राजधानी दिल्लीत छापेमारी, 400 किलो ‘एमडी’ जप्त; पुणे पोलिसांकडून तब्बल 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो एमडी (MD) जप्त (Videos)
- Pune Police News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा कुरकुंभ येथील कंपनीवर छापा, 1100 कोटी रुपयांचे 600 किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त
Comments are closed.