पुणे : बहुजननामा ऑनलाइन – नाशिकमध्ये खासगी बसला आग (Nashik Bus Fire) लागल्याची घटना ताजी असतानाच भीमाशंकर (Bhimashankar) येथे प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बसला आग (Pune Bus Fire) लागल्याची धक्कादयक घटना समोर आली आहे. भिमाशंकर रोडवर शिंदे वाडी येथे ही घटना बुधवारी पहाटे घडली आहे. भिवंडीतील भाविकांना दर्शनासाठी घेऊन जात असताना ही घटना (Pune Bus Fire) घडली. बसमधील प्रवासी आणि चालक तत्परतेने बाहेर पडल्याने जीविहताहीन टळली. मात्र आगीत प्रवाशांचे साहित्य आणि बस भस्मसात झाली.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील पाया गावातील 27 भाविक दर्शनासाठी भीमाशंकर येथे निघाले होते. बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्यावर शिंदेवाडीत भाविकांच्या बसने अचानक पेट (Pune Bus Fire) घेतला. बसचालक बाबू बसप्पा सुरपूर Bus Driver Babu Basappa Surpur (वय-30 रा. कल्याण, सोनारपाडा, जि. ठाणे) यांनी तत्परतेने प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. काही वेळातच आग भडकली आणि संपूर्ण बस जळाली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मागील काही दिवसांपासून पुणे महामार्गावर बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस ट्रॅव्ह आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली.
ही घटना एवढी भीषण होती की यात बसने पेट घेतला होता यामध्ये प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.
आज पुण्यात घडलेल्या घटनेमुळे बसच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Web Title :- Pune Bus Fire | bus carrying devotees from bhiwandi caught fire at ghodegaon bhimashankar road
हे देखील वाचा :
Rutuja Latake | ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास उद्धव ठाकरे अडचणीत; तयार ठेवलाय प्लॅन ‘बी’