बहुजननामा ऑनलाइन टीम – हडपसर(Pune) परिसरातील कापरे मळ्यात रक्ताच्या थारोळ्यात(Pune) मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला असावा असा संशय पोलिसांना आहे.
दत्ता साहेबराव कांबळे (रा. माळवाडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कापरे मळा येथे मोकळी जागा आहे. सहसा या परिसरात दारुडे तसेच फिरस्ते असतात. दरम्यान आज सकाळी येथे रक्ताने माखलेला मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर हडपसर पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. डोक्यात दगड घालून केला असावा असा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार तपासाला सुरुवात केली आहे.