Pune Bibvewadi Crime | पुणे : सिनेस्टाईल पाठलाग करुन तरुणावर धारदार हत्याराने वार, दोन सराईत गुन्हेगारांवर FIR

Koita

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Bibvewadi Crime | जुन्या वादातून एका तरुणाचा पाठलाग करुन धारदार शस्त्राने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांवर बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police Station) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी परिसरातील अप्पर जुना बसस्टॉप समोरील बुद्ध विहार समोर घडला आहे. (Pune Bibvewadi Crime)

याबाबत सुरज संतोष कोल्हे (वय-20 रा. सिद्धार्थनगर, अप्पर जुना बसस्टॉप जवळ, बिबवेवाडी) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ओंकार थोरात (रा. जांभुळवाडी, कात्रज), चिक्या लोखंडे (रा. धनकवडी पुणे) व त्यांच्या दोन साथीदारांवर आयपीसी 307, 506, 504, 37(1) सह फौजदारी सुधारणा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ओंकार थोरात याच्यावर खडक व सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. तर चिक्या लोखंडे याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात आयपीसी 307 नुसार गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात पूर्वी वाद झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. फिर्यादी यांचा मानलेला मोठा भाऊ प्रविण बनसोडे याच्यासोबत थांबायचे. बुधवारी रात्री आरोपी प्रवीणच्या दुकानासमोर आले. तो बाहेर आला असता आरोपींनी त्याला शिवीगाळ करुन हातातील धारदार हत्यारे त्याच्यावर उगारली. प्रविण जीव वाचवण्यासाठी सिद्धार्थनगरच्या दिशेने पळाला.

आरोपींनी त्याचा पाठलाग करुन बुद्धविहारच्या समोर त्याला गाठले. हातातील धारदार लोखंडी हत्याराने प्रविण याच्या डोक्यात, मानेवर, दंडावर सपासप वार करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी परिसरातील लोकांनी त्याठिकाणी गर्दी केली. आरोपींनी हातातील धारदार हत्यारे जमलेल्या लोकांच्या दिशेने
फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ करीत आहेत.