Pune-Bangalore Highway Accident | पुणे-बंगळूरु महामार्गावर कोल्हापुरातील वारकऱ्यांच्या ट्रॉलीचा अपघात; एकाचा मृत्यू, 41 जण जखमी
मय्यप्पा कोंडिबा माने (Mayyappa Kondiba Mane) (वय 45, भादोले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मारुती भैरवनाथ कोळी (Maruti Bhairavnath Koli) (वय 40, लाहोटी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Pune-Bangalore Highway Accident)
याबाबत माहिती अशी की, आज (सोमवारी) पहाटेच्या सुमारास शिरवळच्या पुणे थांब्याजवळील परिसरात हा अपघात झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले आणि लाहोटी येथील 43 वारकरी आळंदीकडे (Alandi) ट्रॅक्टर ट्रॉलीतून निघालेले होते. पाठीमागून भरधाव आलेल्या टेम्पोने ट्रॉलीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रॉली उलटून 1 वारकरी ठार झाला, तर 30 जण जखमी झाले. सर्वावर शिरवळ व खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून गंभीर रुग्णांना सातारा येथील नाना पाटील रुग्णालयात (Nana Patil Hospital) दाखल केले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पोलिस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत.
येथील तरुणांनीही जखमींना मदत केली आहे. जखमींची प्रकृती स्थिर असून एक जण गंभीर आहे.
त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
Web Title :- Pune-Bangalore Highway Accident | pandharpur wari accident warakaris trolley crash near wai of satara district one killed 41 injured
हे देखील वाचा :-
Comments are closed.