पुणे : बहुजननामा ऑनलाईन – मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीने हाहाकार माजविला आहे. कोरोनाबाधितांपासून मुले-मुली आणि नातेवाईक दूर गेले. अग्नी देण्यासाठीसुद्दा मुलगा जवळ येईना, अस्थी नेण्यासाठी मुले-नातेवाईक येत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, अमेरिकेतील अनिवासी भारतीय जितेंद्र वैद्य यांच्यासह त्याला अपवाद आहे. जितेंद्र वैद्य यांना आई-वडिल कोरोनाबाधित असल्याचे समजताच त्यांनी तातडीने पुणे गाठले आणि मागिल दोन महिन्यांपासून त्यांची सेवा केली. दोघीही कोरोनातून बाहेर आले आणि वडकीतील गंगा-तारा वृद्धाश्रमाला भेट देऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिल्याचे वृद्धाश्रमाच्या संस्थापिका नीता भोसले यांनी सांगितले.
वडकी (ता. हवेली) येथील गंगातारा वृद्धाश्रमामध्ये इंजिनिअर मराठी लेखक जितेंद्र वैद्य यांच्या “इंतुजींची खाबूगिरी आणि भटजीगिरी” या पुस्तकाच्या विक्रीतून मिळालेली ५१ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिली. पुणे-बारामती लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटिका कीर्ती फाटक यांच्याकडे ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी सूर्यकांत वैद्य आणि भारती वैद्य, प्रा. आई, पुणे शहर संघटिका सविता मते, नगरसेविका संगीता ठोसर, खडकवासला विधानसभा क्षेत्र संघटिका सरोज कार्वेकर, संघटिका मनिषा कुलकर्णी, गंगातारा वृद्धाश्रमाच्या संस्थापक अध्यक्षा नीता भोसले, अॅड. लक्ष्मी माने, साहेबराव भोसले, अनिकेत सोमण, प्रशांत ठोसर, संकेत मते, दीपक कामठे, ज्येष्ठ पत्रकार अशोक बालगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अॅड. लक्ष्मी माने म्हणाल्या की, जितेंद्र वैद्य अमेरिकेत राहतो, त्याचा मुलगा अमेरिकत डॉक्टर आहे, पत्नीसुद्धा तेथील हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. देव पण किती विचित्र खेळ खेळतो बघा…
हा जीतेंद्र अमेरिकेत राहतो. मागिल पाच वर्षांपासून तो आई-वडीलांना भेटलाच नव्हता. मात्र, आई-वडिल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच त्याने तातडीने पुणे गाठले. दोन महिने आई-वडिलांची सेवा करीत आहे. घरात भांडी घासणे, जेवण बनवणे, केरफरशी करणे, कपडे अशी सर्व कामे त्याने केली. आता आई-वडिल दोघेही ठणठणीत बरे झाले असून, ते वृद्धाश्रमात कार्यक्रमासाठी आले होते. मात्र, दुसरीकडे ज्या मुलांनी आई-वडिलांना सोडून दिले, ते वृद्धाश्रमात पाहताना डोळ्याच्या कडा पाणवल्या. जितेंद्र वैद्य शिकागो जवळच्या एका गावात राहतात. त्यांचा मुलगा अमेरिकेत सर्जन असून, कोविड रुग्णांची सेवा करीत आहे. त्यांची पत्नीसुद्धा तेथील हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.