Pune : सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) किशोर जाधव आणि गजानन टोपे यांची ‘या’ ठिकाणी नियुक्ती

Pune

बहुजननामा ऑनलाइन 

 –  पोलिस आयुक्तालयातील 2 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या आज नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी चार पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होता. पुण्यात बदलून आलेल्या अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त किशोरकुमार दत्तात्रय जाधव यांची येरवडा विभागात नियुक्ती करण्यात आली आहे तर सहाय्यक आयुक्त गजानन बाळासाहेब टोपे यांची फरासखाना विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

सहाय्यक आयुक्त गजानन टोपे हे पुणे ग्रामीणमधून पुणे आयुक्तालयात बदलून आले आहेत तर सहाय्यक आयुक्त किशोरकुमार जाधव हे नागपूर शहर येथून पुणे शहरात बदलून आले आहेत. अद्यापही आणखी काही सहाय्यक पोलिस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे समजते.