Pune Anti Corruption | जिल्ह्यातील विशेष न्यायालयातील अतिरिक्त सरकारी वकिल लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ
पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – खेडमधील विशेष न्यायालयाच्या अतिरिक्त सरकारी वकिलाला (अभियोक्ता) Additional Public Prosecutor of the Special Court साडे तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (anti corruption bureau pune) पथकाने काही वेळापूर्वी ही कारवाई केली आहे. त्यामुळे पुणे जिल्हयातील वकिलांच्या (advocate) वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. Pune Anti Corruption | Anti-corruption bureau of pune arrest additional public prosecutor of the special court khed in pune district
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
देवेंद्र मधुकर सोन्नीस (वय 57) असे पकडलेल्या वकिलांचे नाव आहे.
याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
देवेंद्र हे खेड विशेष न्यायालयात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता (Additional Public Prosecutor of the Special Court) आहेत. ते औंध गावात राहतात.
यातील तक्रारदार यांच्या अशिलाचा जामीन अर्ज न्यायालयात आहे.
त्यावेळी त्या जामिनावर सुनावणी होत असताना न्यायालयात हरकत घेऊ नये व जामीन
मिळण्यासाठी मदत करण्यासाठी लोकसेवक देवेंद्र यांनी 5 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
त्याची तक्रार पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आज सापळा कारवाईत तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून साडे तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
विशेष न्यायालयाच्या अतिरिक्त सरकारी वकिलास लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने पुणे शहर आणि जिल्हयातील वकिल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गुन्हयाचा पुढील तपास पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी करीत आहेत.
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत नागरिकांनी एसीबीकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन पुण्याच्या एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (superintendent of police rajesh bansode) यांनी केले आहे.
Web Titel : Pune Anti Corruption | Anti-corruption bureau of pune arrest additional public prosecutor of the special court khed in pune district
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Comments are closed.