पुणे : बहुजननामा ऑनलाईन – जमीन नावावर करुन देण्याच्या आदेशानंतरही जॉईट व्हेचर करार करुन नागरिकांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता जॉईट व्हेचर केलेल्या कंपनीने ओम प्रॉपर्टीच्या (Om Property) भागीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फ्लॅट देण्यास व फ्लॅटचे पैसे देण्यास असमर्थ ठरल्यानंतर न्यायालयाने जमीन नावावर करुन देण्यास सांगितले. त्यानुसार ओम प्रॉपर्टीच्या (Om Property) वतीने संजय ओव्हाळ आणि अशोक ओव्हाळ यांनी मुकेश शुक्ला (रा. नागपूर) यांच्यासह तिघांच्या नावावर ४३ गुंठे जागा नावावर करुन दिली. मात्र, त्याअगोदर या दोघांनी हीच जागा फेब्रुवारीमध्ये सागर भालेराव यांना जॉईट व्हेंचर करार करुन दिली होती. त्यामुळे मुकेश शुक्ला यांनी ६ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी ओव्हाळ यांच्यावर दाखल केला आहे.
आता याच प्रकरणात सागर रमाकांत भालेराव (वय ४७, रा. सोमवार पेठ) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. धायरी येथील ४३ गुंठे जमीन ही निर्वेध, बिनजोखमी असल्याचे सांगून या प्रॉपर्टीबाबत न्यायालयात दावा दाखल नसल्याचे खोटे सांगून फिर्यादी यांच्या कुशल सागर बिल्डर्स कंपनी सोबत जॉईट व्हेंचर करुन करारनामा केला. मुकेश शुक्ला व इतरांनी न्यायालयात दावा दाखल केला होता, हे लपवून ठेवले. बांधकामासाठी पुणे महापालिकेची पुर्नमान्यता व आरोपींना ३ कोटी ५१ लाख रुपये असे एकूण ४ कोटी ८७ लाख १३ हजार ९६६ रुपये गुंतविले असताना फिर्यादी यांना काही एक माहिती न देता ही जमीन मुकेश शुक्ला यांना विकून फिर्यादीची फसवणूक केली. अशा प्रकारे एकाच जमिनीबाबत दोन व्यवहार करुन जवळपास १० कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी दोघांवर दोन गुन्हे दाखल केले आहेत.
कृपया हे देखील वाचा:
Unlock च्या गोंधळावरून फडणवीसांची सरकारवर टीका, म्हणाले – ‘ही अपरिपक्वता की श्रेयवाद?’
उत्तर प्रदेश भाजपमध्ये बंडाची तयारी? 126 आमदार झेंडा बदलण्याच्या मनस्थितीत
जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?