बहुजननामा ऑनलाइन टीम – नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात घडली असून मावसभावानेच तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर कारमध्ये बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुधवारी दुपारी बावधन परिसरात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी एका 30 वर्षीय तरुणीने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ३५ वर्षीय मावस भावाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी तरुणीचा आरोपी मावसभाऊ आहे. त्याने मावस बहिणीला बुधवारी जबरदस्तीने कारमध्ये बसवले. तो जबरदस्तीने घेऊन जात असल्याने तरुणीने आईला फोन करुन माहिती दिली. त्यावेळी त्याचा राग आल्याने आरोपीने तीचा मोबाईल घेऊन फोडून टाकला. यानंतर हाताने मारहाण करत गाडीत गप्प बस नाहीतर मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर गाडी निर्जनस्थळी बाजूला घेऊन तरुणीला दुसऱ्या कोणाबरोबर लग्न करायचे नाही असे म्हणत बलात्कार केला. झालेल्या प्रकारानंतर तरुणीने पोलिसात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.