पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लग्नाचे आमिष दाखवून आतेभावानेच वारंवार बलात्कार केल्याची घटना पुण्यात(Pune) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रकार पीडीत तरुणीची प्रसूती झाल्यानंतर उघडकीस आला आहे. कुटुंबियांनी(Pune) आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी सचिन विठ्ठल झोरे (रा. कोळेवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी 20 वर्षीय पीडीत तरुणीने फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान पीडीत तरुणी घरात एकटी असताना गप्पा मारण्याच्या बहान्याने आरोपी घरी येत होता. त्याने लग्नाचे अमिष दाखवून वांरवार तरुणीवर बलात्कार केला आणि घरच्यांना न सांगण्याची धमकी दिली. दरम्यान या सगळ्या प्रकरातून पीडीत तरुणी गरोदर राहिली आणि 31 ऑक्टोंबरला तीची प्रसूती झाली. आतेभावानेच घरच्यांना न सांगण्याची धमकी दिल्याने तरुणीने घाबरून ही बाब कुटुंबियांपासून लपवून ठेवली होती. मात्र प्रसूतीनंतर हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर पीडीतेसह कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कोथरुड पोलीस तपास करत आहेत.