पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Ambil Odha । दांडेकर पुलानजीक आंबिल ओढ्याच्या परिसरातील अतिक्रमण (Encroachment) असणाऱ्या घरांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र, आंबिल ओढ्याच्या वसाहतीतील स्थानिकांना आता दिलासा मिळाला आहे. अतिक्रमणे हटविण्याच्या पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) कारवाईला आता स्थगिती देण्यात आली आहे. हा आदेश पुणे महापालिकेच्या न्यायालयानं (Court) दिला आहे. न्यायालयाच्या (Court) आदेशानंतर महापालिकेनं तात्काळ कारवाई थांबवली आहे. जेसीबी मशीन परत जात आहेत. त्यामुळे स्थानिकांनी तुर्तास सुटकेचा श्वास सोडला आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
आंबील ओढ्याच्या परिसरात आज सकाळपासूनच अतिक्रमण हटवण्यात येत होतं. यामुळे अनेक नागरिक आक्रोश करू लागले होते. काही नागरिक आत्मदहनाचा प्रयत्न करत होते. यामुळे पोलीस आणि स्थानिक वाद चिघळला होता. दरम्यान, आंबील ओढा परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं आहेत. ओढ्यामध्ये भर टाकून बांधकामं करण्यात आली आहेत. तर पावसाळ्यात परिसरात पाणी तुंबते. तसंच, मोठं नुकसान होतं, असं महापालिकेचं म्हणणं आहे. या कारणाने येथील अतिक्रमणं हटविण्याची नोटीस महापालिकेनं काढली होती. परंतु, याला येथील नागरिकांनी विरोध केला.
महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) कारवाईवरून स्थानिक नागरिक आरोप करीत होते. आंबील ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न असून त्यात लोकप्रतिनिधींचाही हात आहे, असा आरोप करत नागरिकांनी कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दरम्यान, अशा परिस्थितीवरून हनुमंत फडके यांनी या संदर्भात महापालिका न्यायालयात (Court) धाव घेतली होती. हनुमंत फडके यांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी काही कागदपत्रेही न्यायालयात (Court) सादर केलीत. त्यावर तातडीची सुनावणी करण्यात आली. यावरून न्यायालयाने (Court) कारवाईला स्थगिती दिली आहे.
Web Titel : pune ambil odha slum pune pmc court stays action against structures at ambil odha
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
Navi Mumbai | नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज विशाल मोर्चा