पुणे : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील कोरोना(corona) व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची आकडेवारी समोर येत असली तरी देखील मृत्यू संख्येत मात्र दररोज भर पडत आहे. काही जिल्हयांमध्ये कोरोनाचा(corona) प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 15 जूनपर्यंत राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांनी रूग्णसंख्या कमी असलेल्या शहर आणि ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यापार्श्वभुमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत शहरातील नव्या निर्बंधांबाबतची माहिती दिली आहे. आता पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहणार आहेत.
शनिवारी आणि रविवारी केवळ आणि केवळ अत्यावश्यक सेवांमधील दुकाने सुरू राहणार आहेत. मात्र शहरातील व्यायामशाळा, जिम, उद्यानं, बागा आणि हॉटेल बंद राहणार आहेत. दरम्यान, हॉटेलची पार्सल सेवा सुरू राहणार आहेत. सदरील आदेश हा आगामी दहा दिवसांसाठी असणार आहे. पीएमपीएमएल बस सेवा अत्यावश्यक सेवेत काम करणार्या कर्मचारी आणि अधिकार्यांसाठी सुरू राहणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना सध्यातरी त्याव्दारे प्रवास करता येणार नाही अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. दरम्यान, शहरातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे देखील सांगण्यात आले आहे.
पुण्यातील मद्यविक्रीची दुकाने आठवडयातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत.
व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी – पुणे व्यापारी महासंघ
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुंबईत होणार्या गर्दीवर नाराज, म्हणाले…
अमृता खानविलकर झाली Fitness Freak, तिचे योगा ‘पोज’ पाहून तुम्ही व्हाल…
राज्यात पूर्व मोसमी पावसाचा तडाखा सुरुच, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार धारा