पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. सासवड पुणे रस्त्यावर (Saswad Pune Road) हा अपघात घडला आहे.
ओंकार महेश राऊत (वय 22) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
तर अजित मोदक (वय 25) ha गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार हा सासवड येथील होता.
तो नोकरीच्या शोधात होता.
दरम्यान तो आणि मित्र सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अजित मोदक हे दोघे दुचाकीने सासवड पुणे रस्त्यावरून (Saswad Pune Road) पुण्याकडे येत होते.
यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली.
यात गंभीर जखमी झाल्याने ओंकार याचा जागीच मृत्यू झाला.
तर अजित हा गंभीर जखमी झाला आहे.
यादरम्यान मात्र वाहन चालक घटनास्थळी न थांबता तेथून पसार झाला आहे.
अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही.
अधिक तपास पोलीस करत आहेत.
कृपया हे देखील वाचा:
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची पीएम मोदींसोबत सकारात्मक बैठक, नंतर मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे
इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू, विमानतळ परिसरातील घटना
मुंबईत लोकल सेवा पुन्हा केव्हा सुरू होणार? मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले…
चालत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची गळा चिरून हत्या, प्रियकरानं जेलमध्ये घेतला गळफास