पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune ACB Trap | संचित रजेवर (पॅरोल – Paroll) असलेल्या कैद्यांकडून ५० हजारांची लाच मागितली व त्यापैकी १५ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) हवालदारासह एका महिलेला रंगेहाथ पकडले. हवालदार बाजीराव ज्योतीबा पाटील Bajirao Jyotiba Patil (वय ५४) आणि रेहाना आसिफ सय्यद Rehana Asif Syed (वय ४८) अशी त्यांची नावे आहेत. रेहाना सय्यद या कारागृह आवारातील कॅन्टीनमधील महिला कर्मचारी आहेत. (Pune ACB Trap)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत एका कैद्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार कैद्याची संचित रजा मंजूर करण्यात आली असून सध्या तो कारागृहाबाहेर आहे. खुल्या कारागृहात हा कैदी शिक्षा भोगत आहे. हवालदार बाजीराव पाटील याने कैद्याला ५० हजार रुपयांची लाच मागितली. लाच न दिल्यास त्याच्याविरुद्ध गैरवर्तणूकीचा अहवाल पाठवून त्यास खुल्या कारागृहातून (Yerwada Open Jail) मध्यवर्ती कारागृहात पाठविले जाईल, अशी धमकी दिली. (Pune ACB Trap)
या कैद्याच्या तक्रारीची पडताळणी केल्यावर लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून कैद्याकडून शेख यांनी रक्कम स्वीकारताच त्यांना व हवालदार पाटील यांना पकडले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे (Superintendent of Police Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव
(Additional Superintendent of Police Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे (Deputy Superintendent of Police Sheetal Ghogare) तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune ACB Trap | Taking a bribe from a paroled prisoner was expensive, a woman was arrested along with a constable from Yerawada Jail
हे देखील वाचा :
Sanjay Raut | ‘कारागृहात माझे 10 किलो वजन कमी झाले’ – संजय राऊत
Pune Crime | जळगावमध्ये व्यावसायिकाची 12 लाखाची फसवणूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक