पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune ACB Trap | अडीच लाख रूपयाच्या लाच प्रकरणी बारामतीमधील (Baramati) लघु पाटबंधारे विभागातील अधिकारी इंजिनियर संदीप गोंजारी (Sandeep Gonjari) हे गोत्यात आले आहेत (Pune Birbe Case). त्यांचा साथीदार रणजीत प्रकाश सूर्यवंशी Ranjeet Prakash Suryawanshi (वय – 40, शिक्षक) यांनी लाचेची रक्कम बारामतीमधील जळोची रोड येथे स्विकारली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या भूसंपादन केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदल्याचा प्रस्ताव प्रांत कार्यालय येथे पाठविल्याचा मोबदल म्हणून आरोपी संदीप गोंजारी यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती अडीच लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.
ती रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आरोपी रणजीत प्रकाश सुर्यवंशी यांना जळोचा रोड येथे
ताब्यात घेण्यात आले आहे (Baramati ACB Trap). त्यामुळे इंजिनियर संदीप गोंजारी हे गोत्यात आले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक सुरज गुरव
(Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम शिंदे (PI Ram Shinde),
विरनाथ माने (PI Virnath Mane), कर्मचारी प्रविण तावरे, सौरभ महाशब्दे,
चालक पोलिस अभिजीत राऊत यांच्या पथकाने ही सापळा कारवाई यशस्वी केली आहे.
Web Title : Pune ACB Trap | Pune Bribe Case Engineer Sandeep Gonjari Teacher Ranjeet Prakash Suryawanshi In Trouble Baramati ACB Trap
हे देखील वाचा :
Nashik ACB Trap | नाशिक भूमि अभिलेखचे आणखी दोन अधिकारी आणि खासगी एजंट अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
MP Imtiyaz Jaleel | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल