पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune ACB Trap | अजामीनपात्र वॉरंटमध्ये (Non-Bailable Warrant) अटक न करण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या (Accepting Bribe) लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील (Loni Kalbhor Police Station) पोलीस हवालदाराला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. मुकुंद शंकर रणमोडे Mukund Shankar Ranmode (वय-49) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी (दि.31) पोलीस स्टेशन समोर करण्यात आली.
याबाबत 36 वर्षाच्या व्यक्तीने पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी पोलीस हवालदार मुकंद रणमोडे यांनी पाच हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता पोलीस हवालदार रणमोडे यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीत अंती दोन हजार रुपये स्विकारण्याचे कबूल केले. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारताना पुणे एसीबीच्या (Anti Corruption Bureau (ACB) Pune) पथकाने मुकुंद रणमोडे यांना रंगेहात पकडले. त्यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उप अधीक्षक विजयमाला पवार (Deputy Superintendent of Police Vijayamala Pawar) करीत आहेत.
Web Title :- Pune ACB Trap | Pune ACB Trap on Police Havaldar Mukund Shankar Ranmode
हे देखील वाचा :
SSY | व्याजदर वाढण्यापूर्वी सुकन्या समृद्धीमध्ये झाले 5 बदल, पैसे जमा करणार्यांनी जाणून घ्यावे