Pune ACB Trap | 20 हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलिस हवालदाराविरूध्द अॅन्टी करप्शनकडून गुन्हा

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune ACB Trap | 25 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 20 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस दलातील (Pune Rural Police) भिगवण पोलिस ठाण्यातील (Bhigwan Police Station) पोलिस हवालदाराविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Bribe Case)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रामदास लक्ष्मण जाधव (पोलिस हवालदार, भिगवण पोलिस स्टेशन, पुणे ग्रामीण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या शेताच्या वादावरून भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हयामध्ये ताब्यात घेण्यात आलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलिस हवालदार रामदास जाधव यांनी सर्वप्रथम 25 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. (Pune ACB Trap)
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता पोलिस हवालदार रामदास जाधव यांनी तडजोडीअंती 20 हजार रूपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रामदास जाधव यांच्याविरूध्द भिगवण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम – 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक सुरज गुरव
(Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उप अधीक्षक माधुरी भोसले (DySP Madhuri Bhosale) करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune ACB Trap | Anti-corruption case filed against police constable of pune rural bhigwan police station for demanding bribe of 20,000
हे देखील वाचा :
Pune RTO | गौण खनिजाची वाहतूक करताना ताडपत्रीचे आच्छादन करण्याचे आवाहन
Comments are closed.