पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भरधाव दुचाकी स्लिप होऊन झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. खडकी परिसरात हा अपघात गेल्या झाला आहे.
राजेंद्र चंद्रभान आव्हाड (वय 29, रा. पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस आमलदार प्रदीप न्यायनीत यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हे त्यांच्या दुचाकीवरुन गेल्या महिन्यात (21 मार्च) जात होते. यावेळी ते सेंट जोसेफ गर्ल्स स्कुल समोर आल्यानंतर त्यांचे भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते खाली कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांचा दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.