पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पुणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षात प्रवासी म्हणून बसत दोघांनी चालकाला दगडाने मारहाण करण्याची भीती दाखवून रिक्षा चोरून नेल्याचा प्रकार इमोर आला आहे. मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विशाल दिलीप करपते (वय 21, गंगा विला सोसायटीसमोर हांडेवाडी रोड) आणि विकी गोपाल बुरघाटे (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत रिक्षाचालक कुणाल विनोद अग्रवाल (वय 21) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसानीदिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. ते उणे स्टेशन परिसरात रिक्षा चालवतात. येथे ते रिक्षा प्रवासी घेऊन इतर ठिकाणी जात असत. दरम्यान मंगळवारी सकाळी त्यांच्या रिक्षामध्ये हडपसर येथील ससाणेनगर येथे जाण्यासाठी पुणे स्टेशन येथून दोघेजण बसले. त्यानंतर त्यांना ससाणेनगर येथे जायचे आहे, असे सांगून निघाले. यावेळी रिक्षा बोरगावा वाडेकरवस्ती या परिसरात आल्यानंतर दोन आरोपीनी फिर्यादीला दगडाने मारण्याची धमकी देत जबरदस्तीने रिक्षा चोरून नेली. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.