बहुजननामा ऑनलाइन टीम – दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त (pistol and a live cartridge)करण्यात आले आहे.
बापू ऊर्फ परशुराम अरुण जानराव (वय 41, रा. अप्पर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी दत्तवाडी पोलिसांचे तपास पथक सराईत गुन्हेगारांची माहिती काढत होते. यावेळी कर्मचारी कुंदन शिंदे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, सातारा रस्त्यावर एकजण उभा असून, त्याच्याजवळ पिस्तूल आहे. यानुसार वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे, महेश गाढवे, अमित सुर्वे, विष्णू सुतार, अक्षयकुमार वाबळे, राहुल ओलेकर यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ पिस्तूल व जिवंत काडतुस मिळाले. त्याच्याकडे तपास केला असता, हे पिस्तूल त्याने वारजे माळवाडी येथील मोक्काच्या गुन्ह्यातून सुटन आलेला सख्ख्या मेहुण्याकडून घेतले असल्याचे सांगितले.
बापू जानराव हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई झालेली आहे.