पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शिवाजीनगर येथील जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये किरकोळ आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने तात्काळ आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
शिवाजीनगर येथे मोकळ्या मैदानात जम्बो कोव्हीड सेंटर उभा केले आहेत. मात्र सध्या विविध कारणांमुळे सतत हे सेंटर चर्चेत आहे. पूर्वी डॉक्टरांकडून उपचार व्यवस्थित होत नसल्याने होते, तर नंतर महिलाच गायब झाली. नंतर एका सहकारी डॉक्टर महिलेचा विनयभंग करण्यात आला.
आज सकाळी सेंटरमध्ये कॉम्प्रेशरला किरकोळ आग लागली होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी येथे धाव घेऊन ही आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.