बहुजननामा ऑनलाइन टीम – हडपसरमधील फुरसुंगीत एका कंपनीत दरोडेखोरांनी पिस्तुल व कोयत्याचा धाक दाखवत 1 लाख 27 हजारांची रोकड चोरून नेल्याचा धक्कादायक ( company in Hadapsar snatched)प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे.
याप्रकरणी आशिष मल्हारी पवार (25, रा. भोई आळी, फुरसुंगी ता. हवेली जि. पुणे. मुळ रा. लातुर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दरोडेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथील दिघे वस्ती येथील सोनारपुल येथे डेक्सटल लॉजिस्टीक कंपनी आहे. त्या ठिकाणी मंगळवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पवार व त्यांचे सहकारी पार्सल वेगवेगळे करण्याचे काम करत होते. यावेळी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास अचानक पाच जण तोंडाला रूमाल बांधून व माकड टोपी घातलेल्या अवस्थेत कंपनीत शिरले. त्यांनी लागलीच जवळ असलेल्या पिस्तुलाचा व कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करून कंपनीतील ओमकार यांच्याकडून जबरस्तीने पैसे ठेवलेल्या कपाटाची चावी घेतली. त्यानंतर त्यांनी कपाटातील 1 लाख 27 हजार 337 रूपयांची रोकड चोरी करून ते सर्व जण दरोडा टाकून दुचाक्यांवर पळून गेले. अधिक तपास हडपसर पोलिस करत आहेत.