वैयक्तिक माहिती लपवून लग्नाच्या आमिषाने 32 वर्षीय महिलेवर बलात्कार, विमानतळ पोलिस ठाण्यात FIR

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पाहिले लग्न झालेले असताना त्याची माहिती लपवून 32 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. तर त्याने पिडीत महिलेशी एकाठिकाणी नेहून विवाह देखील केला आहे.
याप्रकरणी जसविंदर सिंह (वय 39) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात32 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपीची ओळख होती. त्यावेळी त्याने ओळखीतून त्यांच्याशी बोलणे वाढवून त्यांना विवाह करण्याचे आमीष दाखवले. मात्र, त्याचे पहिलेच लग्न झालेले आहे. त्याला दोन मुलं आहेत. ही बाब त्याने फिर्यादी यांच्यापासून लपवून ठेवली होती. तर त्याने भडजीला घेऊन दोन साक्षीदार यांच्यासमोर फिर्यादी यांच्यासोबत विवाह केला आहे. तर त्याने यादरम्यान त्याने वेगवेगळ्या ठिकाणी नेहून त्यांच्यावर अत्याचार केले आहेत, असे फिर्यादी लत म्हंटले आहे. अधिक तपास विमानतळ पोलिस करत आहेत.
Comments are closed.