बहुजननामा ऑनलाइन – जलकेंद्रात तोडफोड केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी(yogesh tillekar )माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह 30 ते 35 जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात नेण्यात आले आहे. याप्रकरणी अषित जाधव (वय 56) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार(yogesh tillekar )योगेश टिळेकर यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाधव हे येथे कार्यकारी अभियंता आहेत. स्वारगेट जलकेंद्रातून पाणी पुरवठा व्यवस्थित होत नव्हती. त्यातही कोंढवा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्फत पाणी येत नसल्याने माजी आमदार योगेश टिळेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज दुपारी जलकेंद्रात आंदोलन केले. यावेळी गोंधळ करत त्यांनी येथील केंद्राची तोडफोड केली. तसेच फिर्यादी यांच्या कार्यालयात घुसून टेबलावरील वस्तू फेकत फोडल्या. यामुळे स्वारगेट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच टिळेकर यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.