पुणे : बहुजननामा ऑनलाईन – व्हॉट्सअॅपवर स्टेटस अपलोड करून 24 वर्षांच्या इंजिनियर तरुणाने इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने स्टेटस ठेवून आयुष्य संपवण्याचे संकेत दिले होते. अक्षय पोतदार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील मोशी परिसरात घडली आहे.
चिखली परिसरातील साने चौकात अक्षय मित्रांसह राहात होता. तो एका खासगी कंपनीत इंजिनियर पदावर काम करत होता. त्याने इमारतीच्या टेरेसवर जाण्यासाठी सिक्युरिटी गार्डकडे चावी मागितली मात्र सिक्युरिटीने दिली नाही. त्यानंतर दुसर्या सिक्युरिटी गार्डला प्लॅट पाहायचा बहाणा केला आणि चावी घेतली. अक्षयने 11 व्या मजल्यावरून आत्महत्या केली. हा प्लॅट एक महिन्यापासून बंद आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुळचा सातार्याचा असलेला अक्षयने आई-बाबा आणि बहिणीला सांभाळा मी दुसर्या जगात जात आहे असे स्टेटस अपडेट करुन आत्महत्या केली. त्याच्या मागे आई-वडील आणि बहिण आहे.