पुणे : बहुजननामा ऑनलाईन – शहरात गेल्या १० दिवसात ज्या कंटेंमेंन झोनमधून एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही, असे झोन प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात येणार आहे. त्याचवेळी जेथे कंटेंमेंट झोन नव्हता अशा २३ ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे या २३ ठिकाणींना केंटेंन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात येणार आहे. मागील ४ मे रोजी तिसरा लॉकडाऊन जाहीर झाला. तेव्हा अधिक कोरोना बाधित आढळून आले, असे ६९ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. या ६९ ठिकाणांपैकी २४ ठिकाणी गेल्या १० दिवसात एकही नवीन कोरोना बाधित आढळून आला नाही. त्यामुळे अशा ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्रातून वगळणार आहे.
त्याचवेळी प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या २३ ठिकाणाहून नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. अशा ठिकाणांचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश करण्यात येणार आहे. तेथील लोकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. सदाशिव पेठेतील घाऊक मेडिकलच्या दुकानातून तब्बल ५० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. यासह इतर ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. नवीन आदेश काढण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.