श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी चकमकीत पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि पाकिस्तानी दहशतवादी कारी यासिर यास ठार केले. यासिर काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा प्रमुख होता. या चकमकीत सुरक्षा दलाने त्याच्या दोन सहकार्यांनाही ठार केले. ही चकमक शनिवारी अवंतीपुरामध्ये झाली. मागच्या वर्षी पुलवामा हल्ल्यात सीआपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.
आयईडी ब्लास्टचा एक्सपर्ट
काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले, यासिर पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. हा खतरनाक दहशतवादी आयईडी ब्लास्टचा एक्सपर्ट होता. दोन आणखी मृत दहशतवाद्यांची नावे मूसा उर्फ अबु उसमान आणि दुसरा त्राल येथे राहणारा बुराहुद्दीन शेख आहे. सुरक्षा दलांना माहिती मिळाली होती की, हे दशहतवादी 26 जानेवारीच्या दिवशी मोठा हल्ला करण्याचा कट रचत होते.
दहशतवाद्यांची भरती करत होता
श्रीनगर येथील चिनार कोरचे जनरल-ऑफिसर-कमांडिंग लेफ्टनन्ट जनरल केजेएस ढिल्लो आणि पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, त्राल चकमकीत आम्ही तीन दहशतवाद्यांना ठार केले. ज्यामध्ये जैश ए मोहम्मदचा काश्मीर क्षेत्राचा प्रमुख कारी यासिरचा समावेश आहे. तो मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात सहभागी होता. तो दहशतवाद्यांच्या भरतीसह पाकिस्तानमधून त्यांची ने-आण करत होता.
तीन जवान जखमी
गोळीबारात लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयजीपी म्हणाले, पोलीसांना श्रीनगर आणि परिसरात आयईडी हल्ल्याची माहिती मिळत होती. आम्हाला बुरहान आणि यासिरची नावे माहित होती. त्यांचा एक मित्र आणि यासिरचा दुसरा कमांडर मूसा सुद्धा त्याच्या सोबत होता. आम्हाला विश्वास होता की, मृतदेहांची ओळख पटवली तर त्यापैकी एक यासिर असणार. यासिर आणि मूसा पाकिस्तानचे आहेत. तर, बुरहान स्थानिक रहिवाशी होता.
Visit : bahujannama.com