नळदुर्ग : बहुजननामा ऑनलाइन – सरकारने धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण तत्काळ लागू करावे, अशी मागणी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी नळदुर्ग येथील मेळाव्यात बोलताना केली.शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात धनगर समाजाचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर, गणेश सोनटक्के, राम जवान, संजय घोडके, डॉ. स्नेहल सोनकाटे, माधुरी घोडके यांचीही भाषणे झाली. प्रारंभी धनगर समाजाचे नेते पडळकर व जानकर यांच्या हस्ते पिवळा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर महिलांनी त्यांचे औक्षण केल्यानंतर त्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. यावेळी तुळजापूर तालुका धनगर समाज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समितीच्या वतीने पडळकर व जानकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक ज्ञानेश्वर घोडके तर सुत्रसंचालन दिनेश सलगरे यांनी केले.कार्यक्रमास धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.