चंदीगड : वृत्तसंस्था – पंजाबच्या मंत्रिमंडळाने राज्यातील तरुणांना मोफत स्मार्टफोन देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सत्ताधारी कॉंग्रेसने निवडणुकीपूर्वी तरुणांना स्मार्ट फोन देण्याचे आश्वासन दिले होते. मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे ही योजना डिसेंबरपासून लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रिंडळाच्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे असे राज्य सरकारच्या निवेदनात म्हटले आहे. या अंमलबजावणीसाठी कंपनीची निवड पारदर्शक प्रक्रियेद्वारे केली जाईल, पंजाब माहिती तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेडकडून निविदा कागदपत्रे जाहीर केली जातील, असे या निवेदनात म्हटले आहे.
पहिल्या टप्प्यात या आर्थिक वर्षात सरकारी शाळांमध्ये 11 वी आणि 12वीच्या ज्या विद्यार्थ्यांकडे फोन नाहीत त्यांना स्मार्ट फोन दिले जातील असं सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले.
Visit : bahujannama.com