बहुजननामा ऑनलाईन – तब्बल तीन वर्षांनी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) भारतात परतल्यावर तिने भारतात येताच तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. तिचे हे व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले होते. प्रियंका (Priyanka Chopra) तिच्या हेअर प्रॉडक्ट अनोमलीच्या प्रमोशनसाठी मुंबईत आली होती. याच कार्यक्मासाठी प्रियंका लखनऊमध्ये देखील दाखल झाली होती. मात्र लखनऊमध्ये (Lucknow) तिच्या विरोधात काही पोस्टर्स आढळून आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रियंका चोप्रा उत्तर प्रदेशातील (Utter Pradesh) मुलींवर हिंसा आणि भेदभाव संपवण्यासाठी युनिसेफ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लखनऊच्या दौऱ्यावर आहे. प्रियांका लखनऊला पोहोचायच्या आधीच गोमतीनगर येथील संतमूलक चौकाजवळ तिच्या विरोधात पोस्टर लावण्यात आले. पोस्टरवर असे लिहिण्यात आले की ‘यु आर नॉट वेलकम सिटी ऑफ नवाब’. गोमती नगर पोलीस सध्या हे पोस्टर कोणी लावले याचा शोध घेत आहेत. अद्यापही पोलिसांच्या हाती काही लागले नाही.
प्रियंका (Priyanka Chopra) युनिसेफच्या वतीने अनेक कार्यक्रमात लखनऊमध्ये उपस्थित राहणार
असल्याने दोन दिवस ती लखनऊ मध्येच आहे.
सोमवारी तिने प्राथमिक शाळेतील उपक्रमात सहभाग नोंदवला त्याचबरोबर अंगणवाडी केंद्रात होणाऱ्या उपक्रमाचे देखील तिने निरीक्षण केले.
तर मंगळवारी अभिनेत्री प्रियंका लोकबंधू हॉस्पिटलमध्ये जाणार असून वन स्टॉप सेंटर 181 महिला हेल्पलाइनवर जाणार आहे.
त्याचबरोबर ती गोमती नगर येथील युनिसेफ कार्यालयासह न्यू बोर्न केअर युनिट आणि महिला रुग्णालयाला देखील भेट देणार आहे.
प्रियंकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे प्रियंका लवकरच पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये
(Bollywood) पदार्पण करणार आहे.’जी ले जरा’ (Jee Le Jara) या चित्रपटातून ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये
येण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात प्रियंका चोप्रा सोबत कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि
आलिया भट्ट (Alia Bhatt) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2011 मध्ये आलेला
‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Priyanka Chopra | protest against priyanka chopra in lucknow
हे देखील वाचा :
Pune Crime | येरवडा कारागृहांमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी; हवालदारास मारहाण
Bank Strike | ‘या’ तारखेला देशभरातील बँकांचा संप, ATM सह इतर सेवांवरही परिणाम होऊ शकतो