मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. प्रियांकाच्या ‘द व्हाइट टायगर’ चित्रपटाला ऑस्करसाठी नेमकं मिळाले आहे. ९३ वा अकॅडमी ऑवार्ड अर्थात ऑस्कर २०२१ साठी अर्ज जाहीर करण्यात आला आहे. ५ मार्च रोजी निक जोनास आणि प्रियांका चोप्राने लंडनमधून ऑस्कर नामांकनाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ‘द व्हाइट टायगर’ चित्रपटाला अडेप्टेड स्क्रीनप्ले कॅटॅगरीमध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. प्रियांका या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत. देसी गर्ल प्रियांका आणि तिचा नवरा निक जोनाससोबत ऑस्कर नामांकन सादर केले आहे.
प्रियांकाच्या ‘द व्हाइट टायगर’ चित्रपटालाही अडेप्टेड स्क्रीनप्ले प्रकारात नामांकन मिळाले आहे. दरम्यान निक जोनासने ट्विटरवर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात तो प्रियांका चोप्रासोबत ऑस्कर ट्रॉफी चोरताना दिसत आहे. फोटो पोस्ट करून निक यांनी लिहले आहे की, ‘आज सकाळी मला या सुंदर महिलेसोबत #ऑस्कर नॉमिनेशनची घोषणा करण्यासाठी मिळाले, ज्यांनी ‘द व्हाइट टायगर’ या चित्रपटाचे प्रोड्युसर केले आहे. या टीमला शुभेच्छा. मी पुन्हा २५ एप्रिलला प्रियांका चोप्राना भेटेन.
पती निक जोनासचे ट्विट रिट्विट करून प्रियंकाने लिहले की, ‘माझा स्वतःचा ऑस्कर! हा क्षण तुमच्यासोबत पोस्ट करण्यात मला आनंद आहे. @nickjonas आय लव्ह यू. ९३ व्या ऑस्कर ऑवार्डची घोषणा २५ एप्रिलला होईल. #ऑस्करनॉम्स
‘द व्हाइट टायगर’ मध्ये प्रियांका यांच्या सोबत आदर्श गौरव, राजकुमार राव ही आहेत. या चित्रपटासाठी आदर्श गौरवला बाफ्टा पुरस्कारामध्ये नामांकन मिळाले आहे. रामीन बहरानी यांच्या दिगदर्शनात बनलेल्या या चित्रपटाची प्रियांका सह निर्मात्या आहेत. त्यांचे लेखक दिग्दर्शक रामीन बहरानी यांना व्हाईट टायगरसाठी सर्वोत्कृष्ठ रूपांतरित स्क्रीनप्ले प्रकरणात नामांकन मिळाले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आणि तो खूप लोकप्रिय झाला.
चित्रपटामध्ये आदर्श गौरव मुख्य भूमिका साकारणार आहेत तर प्रियांका, राजकुमार राव सहाय्यक भूमिकेत दिसतील. ऑस्कर नामांकन मिळाल्यानंतर काही तासांनी प्रियांका सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना झालेला आनंद व्यक्त केला.
प्रियंकाने ट्विटरवर लिहले की, ‘आम्हाला नुकतेच ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. रामीन संघाचे अभिनंदन. मी स्वतः ही घोषणा केली आहे, हेच ते विशेष आहे. मला खूप अभिमान वाटतो. प्रियांकाशिवाय राजकुमार राव यांनीही इंस्टाग्रामवर नामांकन मिळाल्याबद्धल आनंद व्यक्त केला. ‘द व्हाइट टायगर’ च्या सेटमधून त्यांनी ‘बिहाइंड द सिन’ चे दोन फोटो शेर केले होते, ‘आम्ही पुरस्कारासाठी नामांकित आहोत’ असे लिहले आहे. रामीन बहरानी टीम ‘द व्हाइट टायगर’चे अभिनंदन.
ऑस्कर जिंकण्याच्या शर्यतीत ‘बोराट सबस्टन्ट मुव्हीफिल्म’, ‘द फादर’, ‘नोमाडलँड’, ‘वन नाईट इन मियामी’, यासह ‘द व्हाइट टायगर’ यांचा समावेश आहे. यावर्षी २५ एप्रिल २०२१ रोजी ‘ऑस्कर २०२१’ सोहळा ठेवण्यात आला आहे. ऑस्कर पुरस्कार फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी आयोजित केले जातात. परंतू यावेळी कोरोनामुळे एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आला.
HIGHLIGHTS
ऑस्करसाठी नामांकित फिल्म ‘द व्हाइट टायगर’
प्रियांका चोप्रा यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला.
२५ एप्रिल ला ९३ वा ऑवार्ड घोषित होणार.