बहुजननामा ऑनलाईन टीम : शेतकरी संघटनांच्या वतीने केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी उद्या (मंगळवार, दि. 8 डिसेंबर 2020) भारत बंद पुकारण्यात आला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यात नेते, खेळाडू, कलाकार अशा अनेकांनी पाठिंबा दिला आहे. यात आता आणखी दोन अॅक्ट्रेसच्या नावाचा समावेश झाला आहे. सोनम कपूर आणि प्रियंका चोपडा यांनी आता या आंदोलनाला समर्थन दिलं आहे. सोशलवरून भावना व्यक्त करून त्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.
‘शेतकरी मानवी संस्कृतीचे संस्थापक’
सोनम कपूरनं शेतकरी आंदोलनाचे काही फोटो सोशलवरून शेअर केले आहेत. यासोबत तिनं डॅनियल वेबस्टरचं वाक्य शेअर केलं आहे. शेतकरी मानवी संस्कृतीचे संस्थापक आहेत, असं तिनं लिहिलं आहे. सोनमचा पती आनंद आहुजानंदेखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
‘शेतकरी फूड सोल्जर’
प्रियंका चोपडानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आपले शेतकरी भारताचे फूड सोल्जर आहेत. त्यांची भीती दूर होणं गरजेचं आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हायला हव्यात. एक सशक्त लोकशाही असलेल्या देशात शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघायला हवा.
Our farmers are India’s Food Soldiers. Their fears need to be allayed. Their hopes need to be met. As a thriving democracy, we must ensure that this crises is resolved sooner than later. https://t.co/PDOD0AIeFv
— PRIYANKA (@priyankachopra) December 6, 2020
अनेक सेलेब्सचा आंदोलनाला पाठिंबा
फेमस सिंगर रूपिंदर हांडा (Rupinder Handa) हिनंही याला पाठिंबा दिला होता. शेतकऱ्यांचं आंदोलन पाहून रूपिंदर भावुक झाली होती. तिनं व्हिडिओ शेअर करत यावर भाष्य केलं होतं. बॉलिवूड आणि पंजाबी सिंगर मिका सिंग, अॅक्ट्रेस हिमांशी खुराना, पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ यांनीही याला पाठिंबा दिला आहे. दिलजीतनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक कोटी रुपये दिले आहेत. बॉलिवूड स्टार सोनू सूद (Sonu Sood) यानंही या आंदोलनाचं समर्थन केलं आहे.