कोलकाता : वृत्तसंस्था – एकीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून संपूर्ण देशात वाद निर्माण झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस कोलकत्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी या कायद्याबाबत सविस्तर विधान केले आहे. या कायद्याबाबत तरुणांच्या मनात मुद्दाम संभ्रम निर्माण केला गेला आहे. मी देशातील तरुणांना सांगू इच्छितो की, देशाचे नागरिकत्व देण्यासाठी सरकारने कोणताही कायदा रातोरात बनवलेला नाही. तसेच हा कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेणारा नसून नागरिकत्व देणारा आहे, असे स्पष्ट विधान मोदींनी केले आहे.
PM Modi: I repeat again, Citizenship act is not to revoke anyone's citizenship, but it is to give citizenship. After independence, Mahatma Gandhi ji and other big leaders of the time all believed that India should give citizenship to persecuted religious minorities of Pakistan pic.twitter.com/UFyC0MsnDe
— ANI (@ANI) January 12, 2020
तरुणांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी त्यांनी हे विधान केले आहे. तसेच मोदींनी ‘फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये राहिलेल्या अल्पसंख्याकांना तिथे धर्माच्या आधारावर छळाचा सामना करावा लागल्यास त्यांना भारताचे नागरिकत्व देण्यात यावे, असे महात्मा गांधी आणि ज्येष्ठ नेत्यांचे मत होते. त्याची या कायद्याच्या माध्यमातून पूर्तता करण्यात आली आहे. आता आपल्या देशात शरणागत म्हणून आलेल्या निर्वासितांना पुन्हा मृत्यूच्या डाढेत ढकलायचे का?,’ असा सवालही मोदींनी केला.
PM Modi: #CAA mein hum nagrikta de hi rahe hain,kisi ki bhi nagrikta chheen nahi rahe hain.Iske alawa,aaj bhi,kisi bhi dharm ka vyakti,bhagwan mein maanta ho na maanta ho,jo vyakti Bharat ke samvidhaan ko maanta hai,vo tai prakriyaon ke tehet,Bharat ki nagrikta le sakta hai. pic.twitter.com/Sp0Jg4mD9K
— ANI (@ANI) January 12, 2020
पुढे त्यांनी “आजही कुठल्याही धर्माची व्यक्ती मग तिचा देवावर विश्वास असो अथवा नसो तिचा भारताच्या घटनेवर निश्वास असेल, तर अशी व्यक्ती योग्य प्रक्रियेद्वारे भारताचे नागरिकत्व मिळवू शकते,” असेही सांगितले. तसेच त्यांनी पूर्वोत्तर भारतावर नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे परिणाम होत असल्याच्या शंकेचेही निरसन केले. पूर्वोत्तर भारतातील संस्कृती आणि परंपरा यांचा आम्हाला अभिमान असून या कायद्याद्वारे त्यांच्या संस्कृती आणि परंपरांवर कोणताही परिणाम होणार नसल्याची तरतूद केली आहे, असेही मोदींनी सांगितले.