वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोनाचा थैमान सुरू आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या 19 एप्रिलपासून 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना कोरोना लस देण्याचे बायडन यांनी जाहीर केले आहे.
अमेरिकेतही कोरोनाचे प्रमाण अधिक आहे. तसेच लसीकरणावरही भर दिला जात आहे. मात्र आता 19 एप्रिलपासून 18 वर्ष आणि त्यावरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येणार असल्याची घोषणा बायडन यांनी केली आहे. अमेरिकेतील बहुतांश नागरिकांना 1 मे 2021 पर्यंत कोरोना लस देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. 19 एप्रिलपासून 18 वर्ष आणि त्यावरील प्रत्येक व्यक्ती लसीकरणासाठी पात्र राहील. अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच लस घेण्यासाठी अधिकाधिक संख्येने पुढे यावे, असे आवाहन बायडन यांनी केले आहे. गेल्या 75 दिवसांमध्ये अमेरिकेत 1.5 कोटी नागरिकांना लस दिली असून आगामी काही दिवसात 2 कोटी नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यापैकी 75 टक्के ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात आली असून, हा लसीचा पहिला डोस असल्याचे सांगितले जात आहे.