नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील कोरोना व्हायरसने आता भारतातही प्रवेश केला असून तीन दिवसात या व्हायरसचे २९ रुग्ण सापडले आहेत. या व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने विमा कंपन्यांसाठी एक सर्क्युलर जारी केले आहे. यात कोरोना व्हायरसच्या उपचाराचा सर्व खर्च कव्हर व्हावा, असे म्हटले आहे. तसेच झाल्यास भारत पहिला देश असेल जो कोरोना विमा कव्हरमध्ये येतो. या व्हायरसमुळे जगभरात ३ हजर लोकांचा मृत्यू झाला असून ९० हजार पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे.
आयआरडीएकडून जारी केलेल्या सर्क्युलरमध्ये आरोग्य विमा गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने विमा कंपन्यांना सूचना देण्यात आल्याचे सांगितले असून त्यांनी तशी पॉलिसी तयार करावी. ज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करता येतील. तसेच उपचाराचा खर्च पूर्ण उचलला जाईल, अशी पॉलिसी तयार करायला सांगितली आहे. आयआरडीएने विमा कंपन्यांना कोविड-१९ बाबतीत तातडीने मार्ग लावण्यात यावा, असे म्हटले आहे.
तसेच आयआरडीएने या व्हायरसबाबत सर्क्युलर जारी केल्यावर एसबीआय जनरल इन्शोरेजचे हेड सुब्रमण्यम बी यांनी कोरोना व्हायरस दाव्याचा निपटारा तेव्हा होईल जेव्हा रुग्ण २५ तास रुग्णालयात असतील, असे सांगितले. भारत सरकार किंवा जागतिक आरोग्य संघटनेने भारतात कोरोना व्हायरसला राष्ट्रीय आरोग्य आपत्ती जाहीर केली तर विम्याची रक्कम मिळणार नाही. कारण आजार आरोग्य विम्याच्या अंतर्गत येत नाहीत. चीनमधील कोरोनाची आता भारतातही पसरायला सुरूवात झाली असून बुधवारी याची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढून २९ झाली आहे. संसर्ग झालेल्या लोकांमध्ये १६ जण इटलीचे पर्यटक आहेत.