मुंबई न्यूज (Mumbai News) : बहुजननामा ऑनलाईन – सिनेसृष्टीत अनेक नामांकित अभिनेत्रींनी स्वतःला आलेले धक्कादायक अनुभव सांगितले आहेत. त्यावरूनच सिनेसृष्टीतील मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लैंगिक गैरव्यवहाराची (Sexual abuse) प्रचिती येते. काहींनी तर निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात पोलीस तक्रार दाखल केल्याचे पहायला मिळाले आहे. आता या यादीत आणखी एका नाव जोडलं गेलं आहे ते म्हणजे आश्रम फेम अभिनेत्री प्रीती सूद (Preeti Sood ) हीच. कारण तिनं ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला कास्टिंग काऊचचा (Casting couch) अनुभव सांगितला. ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर एका मीटिंगमध्ये दिग्दर्शकाने मांडी आणि क्लिवेज दाखवण्याची मागणी तिच्याकडे केल्याचे तिनं म्हंटल आहे. preeti sood about casting couch in bollywood
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
प्रीती सूद (Preeti Sood) म्हणाली की, ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर दिग्दर्शकाने व्यक्तिरेखा समजावून सांगण्यासाठी एक मिटिंग बोलावली होती.
त्यास मी गेले. तेथे गेल्यानंतर चित्रपटाबद्दल बोलायचे राहिले बाजूला दिग्दर्शक सतत माझ्या कपड्यांबाबत बोलत होता.
मी एक्स्पोज करणारे कपडे घालावे, मांडी आणि क्लिवेज दाखवावे अशी त्याने मागणी केली.
मी तिथून ताडकन उठून गेले.
या घटनेनंतर मी प्रत्येक ऑडिशन अगदी सावधपणे देते असे तिने सांगितले.
या मुलाखतीत तिने आपल्या करियरवरही भाष्य केले आहे.
याबाबत आलेल्या अनुभवाबाबत बोलताना प्रीती म्हणाली, तिच्याबाबत ऑडिशनवेळी अश्लील टिप्पणी केली जायची.
त्याचा विरोध केला तर रोल नाकारला जायचा. याबाबत विचारले तर इतकी विचित्र कारणे द्यायची की ते एकावयासही नको वाटत होती.
कधी तुम्ही लहान आहे तर कधी तुम्ही मोठे आहात, मुख्य अभिनेत्रींपेक्षा मी खूप सुंदर आहे असे सांगून अगदी शेवटच्या क्षणाला एका चित्रपटातून काढण्यात आल्याचं ही तिनं यावेळी सांगितले.
Web Title : preeti sood about casting couch in bollywood
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update