मेष
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. व्यवसायातील चिंता दूर होईल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन अचानक बिघडू शकतो. कुणाला कसलेही आश्वासन देऊ नका. व्यापार पुढे नेण्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याची आवश्यकता असेल. भावांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल.
वृषभ
काही विशेष करून दाखवण्याचा दिवस आहे. भागीदारीच्या व्यापारात तुमच्यावर भार येईल पण मोठा लाभ होईल. कुटुंबाच्या जबाबदार्या वाढतील, तणाव वाढेल. नोकरीत नवीन काम सोपवले जाईल, ते इमानदारीने करा, सहकार्यांची साथ लाभेल. विद्यार्थी स्पर्धेत भाग घेतील.
मिथुन
कर्तव्यांची पूर्तता करावी लागेल, ज्यामुळे काही अडचणी वाढतील, रागावर नियंत्रण ठेवा. धैर्य राखा. व्यापारात काही समस्या येतील, परंतु त्यांना तोंड द्या, कमजोर समजू नका. आगामी काळ आनंदाचा आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याचा आहे. सायंकाळी अशा कुटुंबाची भेट होईल ज्यांना मदत करावी लागेल.
कर्क
दिवस संमिश्र आहे. आवेशात येऊन व्यवसाय आणि नोकरीत चूका करणे टाळा, समस्या वाढू शकतात. विवाहाचे प्रस्ताव येतील. कुणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नका. स्वतासह दुसर्यांच्या चांगला विचार करा. नवीन व्यवसाय किंवा कराराचा योग आहे. नोकरीत सहकार्यांपासून सावध रहा.
सिंह
चारही बाजूचे वातावरण आनंदी राहील. बिझनेसमध्ये प्रिय व्यक्तीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. जे नुकसान करू शकतात, अशा लोकांपासून दूर रहा. अडकलेले पैसे मिळतील. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. जोडीदार खुश दिसेल.
कन्या
दिवस मध्यम आहे. कुटुंबातील जबाबदार्या समजून घ्या, अन्यथा नात्यात अंतर येऊ शकते. जोडीदाराशी मतभेद होतील, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षेत्रात काही फेरबदल सुद्धा करावे लागतील. लक्ष ठेवा. बदल चांगले परिणाम देतील. प्रेम जीवनात बाहेर फिरायला जाल. विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील.
तुळ
दिवस गोंधळाचा आहे. व्यापारात लाभाची संधी येईल, पण गोंधळून जाऊ नका. कार्यक्षेत्रात महत्वाचे कागदपत्र सांभाळा, मोठ्या अडचणीत सापडू शकता. वडीलांची तब्येत घसरू शकते, खाण्या-पिण्याची काळजी घ्या, डॉक्टरांकडे जा. उधार देताना विचारपूर्वक द्या, परत येण्याची शक्यता कमी आहे.
वृश्चिक
दिवस संमिश्र आहे. नवीन नोकरी शोधण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय चालवायचा असेल तर दिवस उत्तम आहे. परंतु सर्व बाजू तपासून घ्या, तरच पुढे जाल. यामध्ये वडीलांचा सल्ला आवश्य घ्या. सासरच्या बाजूकडील कुणाशी तरी वाद होऊ शकतो. सावध रहा, रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
धनु
सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. नोकरी किंवा व्यापारात निष्काळजीपणा नको, शत्रु फायदा उचलू शकतो. होणारे काम बिघडेल. रखडलेले काम पूर्ण झाल्याने कुटुंबासोबत वेळ घालवाल. संततीला यश मिळाल्याने आनंद होईल. सासरच्या बाजूकडून धनलाभ होऊ शकतो.
मकर
दिवस प्रगतीचे मार्ग खुले करणारा आहे. छोटा प्रवास करू शकता. एखादा नवस केला असेल तर तो आज पूर्ण करण्यासाठी जाऊ शकता. संततीची जबाबदारी पार पाडाल. व्यवसायाची डील ताणून धरू नका, नुकसान होऊ शकते. बहिण किंवा भावाच्या विवाहातील अडथळा दूर होईल. आई-वडीलांची सेवा कराल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळा दूर होईल.
कुंभ
संमिश्र परिणामांचा दिवस आहे. रूटीन बदलू शकता. स्वतासाठी वेळ काढाल, पैसे खर्च कराल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत सापडतील, आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत वाद झाल्यास वाणीवर नियंत्रण ठेवा, तरच सन्मान मिळेल. नोकरीत नवीन पद मिळेल.
मीन
खर्चाचा दिवस आहे. घराच्या सजावटीसाठी खर्च कराल. उत्पन्नाकडे लक्ष द्या. मालमत्तेच्या वादात दुपारनंतर विजय होईल. सामाजिक कार्यात खर्च कराल. सायंकाळी मित्रांसोबत सामाजिक सोहळ्यात उपस्थित राहाल. ओळखी होतील.