Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Pravin Darekar | praveen darekar comment on sharad pawar in pimpri chinchwad says the importance of devendra fadnavis does not depend on the words of sharad pawar

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत गौप्यस्फोट केला होता. याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारले असता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर भाष्य करुन त्यांचं आणखी महत्त्व वाढवावं असं मला वाटत नाही. असं म्हटलं होतं. यावर भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्व कमी होत नाही. फडणवीस हे देशासह राज्यातील मोठे नेते असल्याचे प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सांगितले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय लवकरच होईल. या प्रकरणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला वेळकाढूपणा करायचा होता. मात्र, न्यायालय असे करेल असे मला वाटत नाही. मेरिटवर आणि लोकशाहीवर आधारभूत असलेला निर्णय होईल, अशी अपेक्षा असल्याचे दरेकर म्हणाले. तर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल बोलण्यात रस नसल्याचे सांगत ते प्रसिद्धीसाठी काहीही बोलत असतात असा टोला दरेकरांनी (Pravin Darekar) लगावला.

 

कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या (Pune Kasba Peth Bypoll Election) प्रचारात आजारी असताना देखील गिरीश बापट (Girish Bapat) हे प्रचारात सहभागी झाले.
यावरुन विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना प्रवीण दरेकर म्हणाले, गिरीश बापट हे स्व:इच्छेने आले होते.
निवडणूक असल्याने विरोधक या प्रकरणी टीकाच करणार, कौतुक नाही.
भाजपच्या दिवंगत मुक्ता टिळक (Late Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Late Laxman Jagtap)
यांनी देखील मुंबईला जाऊन मतदानाचा हक्क बजावत आपले कर्तव्य पार पाडले होते, असे दरेकर म्हणाले.

 

Web Title :- Pravin Darekar | praveen darekar comment on sharad pawar in pimpri chinchwad says the importance of devendra fadnavis does not depend on the words of sharad pawar

 

हे देखील वाचा :

Maharashtra Prison Department | मुंबई विभागातील न्यायधीन बंद्यांसाठी राज्य कारागृह विभागाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics | पहाटेच्या शपथविधीवरुन शिंदे गटाच्या आमदाराचा नवा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘शपथविधीबाबत संजय राऊतांना…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा